First-Year Engineering Admission 2020
--------------------------------------------
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन
--------------------------------------------
<<Click here to download the activity Schedule>>
डिसेंबर ९ ते १५:
DTE च्या https://fe2020.mahacet.org/StaticPages/HomePage या वेबसाईट वर प्रवेशअर्ज भरणे व ॲप्लिकेशन आयडी व पासवर्ड मिळवणे. तसेच या वेबसाईट वरच सर्व कागदपत्रांच्या scanned images अपलोड करणे.उमेदवाराने अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी E- Scrutiny होईल व त्याची पोचपावती मिळेल. Covid-19 च्या कारणाने यावर्षी कोठेही जाऊन Document Verification करणे आवश्यक नाही.
या करिता DKTE मध्ये कम्प्युटर व इतरही मदत उपलब्ध करून दिले आहे.
उमेदवाराने वेळोवेळी त्याच्या/ तिच्या ॲप्लिकेशन आयडी व पासवर्ड च्या साहाय्याने log-in करून, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे. जर काही कागदपत्रे कमी असली तर त्याची पूर्तता १६ डिसेंबर पूर्वी करणे आवश्यक आहे.
डिसेंबर १८:
कच्ची मेरिट लिस्ट प्रकाशित होईल व उमेदवाराला Provisional मेरिट लिस्ट क्रमांक मिळेल.
डिसेंबर १९ व २०:
उमेदवाराला मेरिट लिस्ट बाबत काही तक्रार असेल तर त्याच्या log-in मधून नोंदवू शकतो.
डिसेंबर २२:
उमेदवाराला अंतिम मेरिट लिस्ट क्रमांक मिळेल, येथून पुढच्या प्रक्रिये करिता हा क्रमांक महत्वाचा आहे.
डिसेंबर २२:
CAP प्रक्रिये मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व जागाविषयी माहिती प्रसिद्ध होईल. सर्व कॉलेजेस मध्ये कोणकोणत्या branches उपलब्ध आहेत व तेथे विविध cast/ category करिता किती जागा उपलब्ध आहेत याचे Seat Matrix समजेल.
डिसेंबर २३ ते २५:
उमेदवाराने CAP Round-1 करीता त्याचा ऑप्शन फॉर्म online भरायचा आहे.
डिसेंबर २८:
उमेदवाराला मिळालेल्या कॉलेज व ब्रँचची माहिती कळेल.
डिसेंबर २९ ते ३१:
उमेदवाराने त्याला मिळालेल्या प्रवेशची स्वीकृती करणे. ही प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन करावयाची असून कॉलेज वर प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे गरजेचे नाही.
--------------------------------------------
सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित, बिनचूक देणे ही उमेदवाराची जवाबदारी आहे